Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’

 भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या शहरात जोरदार ‘‘ब्रँडिंग’’

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  विविध विकासकामांचे लोकार्पण

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारलेले विविध प्रकल्प आणि विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते बुधवार, दि. 18 जून रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण शहरात ‘‘विकासाचे देवेंद्र पर्व’’ असे जोरदार ‘ब्रँडिंग’ केले आहे.

श्रीक्षेत्र देहू – आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित संत समुह शिल्पाचे बहुप्रतिक्षीत लोकार्पण मुख्यमंत्री फडवीस यांच्याहस्ते होत आहे. यासोबत, सर्वांत उंच 200 फुटांचा भगवा ध्वज आणि संतसृष्टी प्रकल्पाचे लोकार्पणसुद्धा होणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष आण्ण बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी उपस्थित राहणार आहेत.

थोरल्या पादुका मंदिर, वडमुखवाडी येथे संतसृष्टी, टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतीपठमधील सभागृह व कक्ष, 1.50 लाख देशी वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने विकसित ‘ज्येष्ठानुबंध’ ज्येष्ठ नागरिकांकरिता ॲप व ‘ट्रॅफिक बडी’ वाहतूक नियमनाकरिता व्हाट्स ॲप प्रणालीचे लोकार्पण करण्यात येत आहे.

 या प्रकल्पांचे होणार भूमिपूजन
प्रभाग क्र. 16 मध्ये मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्किमपर्यंत एक्सप्रेस आय-वे लगतचा 12 मीटर डीपी सर्विस रस्ता. बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवेपर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील 18 मीटर डीपी रस्ता, प्रभाग 16 विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण, गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौकपर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग, दिव्यांग नागरिकांसाठी ‘मॅपिंग’ शुभारंभ करण्यात येत आहे.

 या प्रकल्पाचे होणार लोकार्पण
संत मदर टेरेसा उड्डापुलावरुन चिंचवड बाजुकडे उतरण्यास व चढण्या बांधलेला लूप-रॅम्प, पवना नदीवर थेरगाव प्र. क्र. 50 मध्ये प्रसुनधाम शेजारी 18 मीटर डीपी रस्त्यावर उभारलेला थेरगाव-चिंचवड पुल, पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी उभारलेली क्लायबिंग वॉल, प्रभाग क्र. 4 दिघी येथे आरक्षण क्र. 2/122 येथे बांधलेली शाळा इमारत, प्रभाग क्र. 3 चऱ्होली येथे चोविसावाडी येथे उभारलेली अग्निशमन केंद्र इमारत, भोसरी प्रभज्ञग क्र. 7 मधील प्राथमिक शाळा इमारत, थेरगाव व भोसरी येथील रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग, प्रभाग क्र. 5 मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारतीचे लोकार्पण करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली. शहराचा पाणी प्रश्न, समाविष्ट गावांचा विकास, पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यात आल्या. त्यामुळेच सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड नावारुपाला येत आहे. 2014 पासून निरंतर भाजपा महायुती सरकारने शहर विकासाला चालना दिली आहे. आज लोकार्पण आणि भूमिपूजन होणारे प्रकल्प त्याचे उदाहरण आहे. शाश्वत विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून शहराचा लौकीक व्हावा, अशा ध्येयाने आम्ही काम करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00