Home पिंपरी चिंचवड प्लास्टिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध- आ. लांडगे

प्लास्टिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध- आ. लांडगे

 मोशीत प्लास्टो प्रदर्शनाचे उदघाटन, ना मोहोळ, ना पाटील देणार भेट

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
  पिंपरी
या प्रदर्शन केंद्राला राज्यातील प्रेक्षणीय प्रदर्शन केंद्र  बविण्यासाठी लवकरच या ठिकाणी छ. संभाजी महाराजांचा दीडशे फुटाचा पुतळा उभारला जाणार आहे.जो  स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण असेल. असे आश्वासन देत प्लास्टिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, त्याच बरोबर याच जागेवरती प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यासाठी  आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहोत. असे उदगार आ. महेश लांडगे यांनी काढले. यावेळी प्लास्टोच्या सूचीचे प्रकाशन करण्यात आले.
असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लॅस्टिक्सच्या वतीने  (एपीपी) दि. 8 ते 11 या दरम्यान मोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्लास्टो २०२५ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
 यावेळी दिग्दर्शक / लेखक प्रवीण तरडे, एनसीएलचे माजी संचालक पद्मश्री डॉ. एस. सिवराम, टोयो मशिनरी अॅण्ड मेटल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तोशियुकी सोटोइके, मिलाक्रॉनचे व्यवस्थापकीय संचालक बिल शुक्ला, अभिनेता रमेश परदेशी, एआयपीएमए गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष अरविंद मेहता,लेबटेक डेनमार्क कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक जेस्सी, एलके मशिनरी- हाँगकाँगचे विपणन संचालक जॅकी वाँग,मिलेक्रॉनचे बील शुक्ला, ‘असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लॅस्टिक्स’चे अध्यक्ष अनिल नाईक आणि प्लास्टो २०२५ प्रदर्शनाचे अध्यक्ष अजय झोड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पद्मश्री शिवराम म्हणाले कि, प्लास्टिक उद्योग हे एक उदयनमुख क्षेत्र बनले आहे. प्लास्टिक हे आपले जीवनमान उंचवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.भविष्यात पर्यावरण पूरक वाहनांचा काळ  असणार आहे. या वाहनामध्ये जास्तीत प्लास्टिकचा वापर होणार आहे, यामुळे आपले जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी प्लास्टिकचा वापर पोषक ठरणार आहे.उद्योजक आणि  सरकार यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
अभिनेते तरडे म्हणाले कि,”या पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकते”,असा डायलॉग मुळशी पॅटर्न मध्ये लिहून प्लास्टिकची जाहिरात केली.दैनंदिन जीवनात प्लास्टिक शिवाय जगू शकत नाही. प्लास्टिक एक जगण्याचा भाग बनला आहे.50% टक्के लोक हे प्लास्टिक उद्योगावर पोट भरत आहे. उद्योजक हा देशाचा कणा आहे. औद्योगिक क्रांती शिवाय जगाला पर्याय नाही.
बील शुक्ला म्हणाले कि,प्रत्येक क्षेत्रात प्लास्टिक चा वापर होत आहे. देशाच्या अर्थव्यस्थेत प्लास्टिक उद्योगाचे  मोलाचे  योगदान आहे.
अध्यक्ष अनिल नाईक म्हणाले कि,दि.9 रोजी ना. मुरलीधर मोहोळ तर  चंद्रकांत पाटील तर दि 10 रोजी दु 3 वा भेट देणार आहे.या प्रदर्शनात देश विदेशातील 230 कंपन्याचे स्टॉल असून चार दिवसात सुमारे 40 हजार उद्योजक भेट देणार आहे.प्रदर्शनाला भेट देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून मोफत नावनोंदणी करावी लागणार आहे. प्रदर्शनस्थळी क्यूआर कोड उपलब्ध असून  बुधवार ते शनिवार स १० ते सायं ६ या वेळेत प्रदर्शन खुले असेल . प्लास्टिक क्षेत्रातील तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत माहिती देणे ‘एपीपी’चे उद्दिष्ट आहे.
प्रास्ताविक अध्यक्ष अनिल नाईक यांनी तर अजय झोड यांनी स्वागत केले तर आभार समीर कोठारी यांनी मानले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00