महाराष्ट्रातही अवतारणार आदीयोगी

पिंपरी 
महाराष्ट्रात देखील ईशा फाउंडेशनच्या वतीने अदियोगी उपासना केंद्र लवकरच वाढले जाण्याची शक्यता आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी श्री सद्गुरू यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
ईशा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्र उत्सवाचे आयोजित केले जाते. केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही हजारोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. काल रात्री महाशिवरात्रीचा हा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थितांमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सद्गुरु यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना “आपणास महाराष्ट्रात देखील असेच एक केंद्र उभे करावयाचे आहे” अशी इच्छा सद्गुरूंनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे लवकरच महाराष्ट्रात देखील ईशा फाउंडेशनचे केंद्र उभारले जाणार हे निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही लवकरच आदि योगी भगवान शंकरांचा सहवास लाभणार आहे.
Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे