विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन 

पिंपरी 
 पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३०) सकाळी साडे नऊ वाजता उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक, शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, नगरसेवक निलेश तरस, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश बारणे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सहा हजार बेरोजगार युवक, युवतींनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच ऐनवेळी उपस्थित राहून १००० पेक्षा जास्त युवक, युवती नोंदणी  करून सहभागी होतील अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे १२५ कंपनीतील प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. यामध्ये बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील कंपनी व उद्योग प्रतिनिधी तसेच ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया अशा नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. अवघ्या पाचवी पास झालेल्या उमेदवारापासून ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्यांनुसार योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यात करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती सुलभा उबाळे यांनी दिली. यावेळी नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यांची माहिती संकलित करून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या योग्य रोजगाराच्या संधींबाबत त्यांना मार्गदर्शन करून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Please follow and like us:

Related posts

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअरबाबत मार्गदर्शन

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न