बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती

बारामती: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याकरीता प्रशासनाच्यावतीने मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, आज तालुका सायकल संघाच्यावतीने बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत “मतदार राजा जागा हो…लोकशाहीचा धागा हो” ‘मी नारी सगळ्यात भारी.. मी मतदान करणारच…’ आदी आशयांचे फलक घेवून शहरातील तीन हत्ती चौकातून रॅलीचा सुरुवात करण्यात आली आणि समारोप पेन्सिल चौक येथे करण्यात आला. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघातील पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे, येत्या 20 नोव्हेंबर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.

यावेळी सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गणेश शिंदे, बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास वायकर, सायकल क्लबचे सर्व सदस्य आणि प्रचार प्रसिद्धी प्रमुख सविता खारतोडे उपस्थित होते.

*मेडद येथेही मतदार जनजागृती*

स्वीप पथकाच्यावतीने बारामती विधानसभा मतदारसंघात मेडद येथे पारंपरिक वेशभुषा परिधान करुन वासुदेवांनी परिसरात गीताद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.

Please follow and like us:

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

पिंपरी- चिंचवडमध्ये वीज सुविधा सक्षमीकरणस “बूस्टर डोस”‘