डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचा पाठिंबा

पिंपरी 
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत हि कागद वेचणारे, डबा बाटली वाल्या,भंगार, चारचाकी व सायकल फेरीवाले यांची संघटना आहे.कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
संघटनेच्या अध्यक्ष/सचिव यांनी सांगितले की, डॉ. सुलक्षणा शिलवंत या कष्टकरी, श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी नेहमीच संघर्षशील राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यांनी समाजाच्या सर्व स्तरांसाठी प्रामाणिकपणे कार्य केले आहे, ज्यामुळे त्यांना आमचा ठाम पाठिंबा आहे.”
कागद,काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटना नेहमीच श्रमिक, असंघटित कामगार, वंचित घटक यांच्या हक्कांसाठी कार्यरत राहिली आहे. संघटनेच्या सदस्यांनी एकत्रितपणे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या उमेदवारीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ते या समाजघटकांच्या प्रगतीसाठी भक्कम भूमिका बजावतील.
डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की,मला कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचा पाठिंबा मिळाल्याचा अभिमान वाटतो. ही संघटना अनेक वर्षे कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढत आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. मला विश्वास आहे की, मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून समाजातील कष्टकरी वर्गासाठी ठोस कामगिरी करेन. हा पाठिंबा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. मी संघटनेचे मनःपूर्वक आभार मानते आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध आहे.

One attachment • Scanned by Gmail

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे