डॉ.प्रवीण बढे यांना ‘विद्यासागर मानद उपाधी’ प्रदान 

पिंपरी
साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय तसेच आयुर्वेदिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. प्रविण बढे यांना भारत सरकार पुरस्कृत मध्य प्रदेशातील इतिहास व पुरातत्व शोध संस्थानच्या वतीने ‘विद्यासागर मानद उपाधी डॉ. लिट अवार्ड’ नुकताच बालाघाट येथे प्रदान करण्यात आला. यावेळी नोबल पुरस्कार निवड समितीचे डॉ वीरेंद्र गहवार , सिनेट प्रेसिडेंट डॉ फिरदोस श्रॉफ यांच्या हस्ते, स्थानिक खासदार आमदार यांच्या उपस्थितीत हा बहुमान प्राप्त झाला. संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कृतिशील कार्य, समाजसेवा आणि संशोधनातील योगदानाची दखल घेतली. संस्थेच्या मते, डॉ. बढे यांनी आयुर्वेद, आरोग्य विषयक लेखन, समाजहिताचे उपक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन व विविध क्षेत्रातील कार्याद्वारे सांस्कृतिक-सामाजिक विकासात विशेष योगदान देत आहे . बढे यांची साहित्यनिर्मिती, संशोधनात्मक दृष्टिकोन, पर्यावरणाबद्दलची जाण व सामाजिक बांधिलकी यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्थेच्या निवेदनात नमूद केले आहे की, डॉ. बढे यांनी आपल्या लेखणीद्वारे लोकांमध्ये आरोग्य, संस्कृती, अध्यात्म, पर्यावरण आणि समाजजागृतीचा दीप प्रज्वलित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. त्यांच्या कार्याचा भावी पिढ्यांनाही निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. डॉ बढे यांना हा मानद सन्मान विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे