खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

पिंपरी 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. आता पायीपीठ थांबणार असून सायकलवर शाळेत जाता येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

या प्रसंगी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे, नगरसेवक निलेश बारणे,  माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, बाळासाहेब ओव्हाळ, धनाजी बारणे, धनाजी विनोदे, शांताराम भोंडवे, नंदू जाधव, माऊली घोगरे, बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. समाजातील गरजवंताचा शोध घेऊन त्यांना विविध माध्यमातून मदत केली जाते. विद्यार्थ्यांना शालेय मदत करण्यासाठी खासदार बारणे यांचा नेहमी आग्रह असतो. त्यातूनच यंदा शहरातील शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. त्यांची शाळेत जाण्याची अडचण ओळखून सायकल वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना  सायकलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची पायीपीठ थांबणार असून सायकलवर शाळेत जाता येणार आहे. वेळेत सायकलवर जाता येईल.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसतो, तर समाजाला काहीतरी परत देण्याची संधी आहे. याच भावनेतून वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणासाठीचे प्रत्येक पाऊल सोपे व्हावे, वेळ वाचावा आणि स्वप्नांच्या दिशेने त्यांची वाट अधिक वेगाने पुढे जावी. विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच आपला खरा आनंद आहे.

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे