पिंपरी
कुदळे फौंडेशनच्या वतीने एस स्पायसेस रेस्टॉरंटच्या सहकार्याने नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले. यावेळी सुमारे एक हजार नागरिकांनी या मोफत अन्नदानाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी बाजारात आलेल्या सर्व नागरिकांना मोफत बिर्याणी, रायता आणि गुलाबजाम वाटप करण्यात आले. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष नानासाहेब कुदळे यांनी खडकीतील सर्व मान्यवरांचे स्वागत केले. खडकी बाजार येथील व्हीलक्स टॉकीज कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘एस स्पायसेस’ या रेस्टॉरंटच्या समोर कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी व्यवस्थापकीय संचालक नीरज कुदळे म्हणाले की, कुदळे फौंडेशनने आजवर अनेक सामाजिक कामे केली आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अजातगायत तब्ब्ल १७ रुग्णवाहिका देवून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शुभम कुदळे यांनी मानले.
Please follow and like us: