अजितदादांच्या स्मृति जतन करण्यासाठी ब्रांझचा पुतळा उभारणार  – प्रशांत शितोळे

पिंपरी 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने उभारल्या जात असलेल्या इमारती समोर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे हे होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडी संदर्भात आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणारा प्रस्ताव विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी मांडला. यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात सर्वात मोठा वाटा अजितदादा पवार यांचा आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहात विरोधी पक्ष म्हणून जरी असला तरी सभागृहात असलेल्या नगरसेवकांपैकी व सभागृहाबाहेर असलेल्या नेत्यांपैकी 80 टक्के लोक हे अजित दादा पवार यांनी घडविलेले आहेत. अजितदादा पवार यांचा पुतळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत बसविण्यात यावा व महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र बसविण्यात यावे असा प्रस्ताव भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी मांडला.
भाऊसाहेब भोईर यांच्या श्रद्धांजलीपर प्रस्तावास अनुमोधन देताना सत्तारूढ पक्ष नेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले की शहराचे आमदार महेश दादा लांडगे यांनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती जवळ अजितदादांचा पूर्णाकृती ब्रांझचा पुतळा उभारण्यात येईल. ते पुढे म्हणाले की अशाप्रकारे पुतळा उभारण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे परंतु अजितदादा पवार यांचे विचार शहरात रुजण्यासाठी त्यांच्या स्मृती जतन करणे आवश्यक आहे.
Please follow and like us:

Related posts

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर