पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिक व शिवप्रेमी संभाजी बारणे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी …
latest in fashion
-
-
पिंपरी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी झालेल्या बलात्कार घटनेतील गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी यासाठी तपास जलद गतीने पूर्ण करावा. तसेच अल्पवयीन पीडित मुली व तिच्या कुटुंबियास शासकीय सहाय्य ताबडतोब मिळावे …
-
पिंपरी-चिंचवड साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी व लोकजागृतीच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच युवकांमध्ये आरोग्य, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, याच उद्देशाने …
-
पिंपरी पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहेच. २०११ मध्ये १७ लाख असलेली शहराची लोकसंख्या आजमितीला ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणावर निवासी विकास, पायाभूत सुविधा, मेट्रो विस्तार आणि औद्योगिक वाढ यामुळे …
-
पिंपरी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती …
-
पिंपरी “पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वेग लक्षात घेता मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हे, तर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात,” असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला दिले. महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे,महेश लांडगे,शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठीया, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महामेट्रो आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराचे सादरीकरण केले. महामेट्रोकडून मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादर करण्यात आला. प्रस्तावित मार्ग, त्यांची व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील विस्तार, विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील नव्याने विकसित होत असलेले निवासी परिसर, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी केंद्रे तसेच प्रमुख वाहतूक मार्गांना मेट्रो नेटवर्कशी प्रभावीपणे जोडण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि शहराच्या विस्तारणाऱ्या सीमांचा विचार करून डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या. मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, यासाठी बस सेवा, पार्किंग, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ यांचा प्रभावी समावेश असावा, अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळण्यास तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सुलभता निर्माण होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आगामी काळातील लोकसंख्या, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा विस्तार तसेच नागरिकांच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावे. आजच्या गरजांसोबतच पुढील अनेक दशकांचा विचार करून तयार होणारे मेट्रो नेटवर्क शहराच्या विकासाला नवी दिशा देईल. त्यामुळे डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारावा.”
healthy living
Featured Videos In This Week
पिंपरी ‘बदलत्या काळात नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे हताश होऊन चालणार नाही. त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एआयच्या जगातही …
पिंपरी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी …
Latest Posts
-
पिंपरी चिंचवड
पावसाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जनहिताच्या १४ प्रमुख मुद्यांवर आमदार अमित गोरखे यांनी उठवला बुलंद आवाज! मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परंपरेप्रमाणे घेतली जाणारी पत्रकार परिषद न घेता राखली सामाजिक संवेदनशीलता
पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे, विकासाचे आणि सुरक्षिततेचे विविध प्रलंबित प्रश्न शासनदरबारी अत्यंत …
-
पिंपरी भारताच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीसाठी नवोपक्रम व संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आगामी काळात पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) हे स्टार्टअप केंद्रित विद्यापीठ म्हणून विकसित करण्यात …
-
पिंपरी चिंचवड
पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेबाबत आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक- खा. श्रीरंग बारणे
पिंपरी मावळातील पवना धरण परिसरातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत आंदोलनात सहभागी शेतकरी आणि प्रशासनाबरोबर सोमवारी समन्वय बैठक झाली. या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत …
-
भाजपाचे विकास डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार आर्थिक नुकसानभरपाई, नोकरी, घर, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी पिंपरी-चिंचवड मोशी येथील कचरा डेपो परिसरात अतिवृष्टीमुळे लँडफिलचा काही भाग खचून …
-
महाराष्ट्र
राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
मुंबई राज्यातील वनसंपत्तीचे संरक्षण, बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा, वनमाफियांविरोधातील कारवाई आणि वन विभागाची कार्यक्षमता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमित …
-
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता करावर जाहीर करण्यात आलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही शेवटची मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. ३० जूननंतर या सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वीच मालमत्ता कराचा भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका हद्दीत सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटींहून अधिक मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख ४६ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत योजनेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उर्वरित मालमत्ताधारकांनीही ३० जूनपूर्वी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. तसेच, १ जुलैपासून मालमत्ता कर वसुली मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार आवाहन करून तसेच जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास हा आपल्या सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. नागरिकांनी भरलेला प्रत्येक रुपया शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि विविध विकासकामांमध्ये खर्च केला जातो. त्यामुळे ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर सवलतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकाने लाभ घ्यावा. रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापालिकेच्या उत्पन्नातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या सुविधांमध्ये आणि शहराच्या विकासकामांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे मालमत्ता कराची वेळेत वसुली ही महापालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना अधिक लाभ मिळावा म्हणून ३० जून २०२६ पर्यंत १० टक्के सवलत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आली आहे. या अंतिम संधीचा लाभ घेत नागरिकांनी कराचा भरणा करावा. यानंतर महसूल वसुलीच्या नियोजनानुसार विशेष मोहीम राबविण्यात येईल. डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका मालमत्ता करावरील १० टक्के …
-
महाराष्ट्र
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’च्या माध्यमातून पंढरपूरचा …
-
लाभार्थ्यांना वेळेवर सेवा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा मुंबई / पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३२ लाख नागरिकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न विधानसभेत चर्चेत आला. भाजपाचे आमदार …
-
आमदार महेश लांडगे यांची महत्वपूर्ण लक्षवेधी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सभागृहात आश्वासन मुंबई / पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेड झोन’ बाधित नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर विधानसभेत …
-
उरण उरण तालुक्यात एका दिवसात तब्बल तीन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या या …

