Home पुणे पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आराखडा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाला लवकरात लवकर सुरूवात करावी –  डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आराखडा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाला लवकरात लवकर सुरूवात करावी –  डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

पुणे आर्थिक क्षेत्राचा ‘पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आर्थिक बृहत् आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात यावी. यामध्ये सर्व संबंधित घटक, नागरिकांडून उपलब्ध बाबींची माहिती जमा करणे तसेच सूचना घेण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण नमुना तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

‘पुणे महानगर ग्रोथ हब’ बाबत विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, आयएसईजीचे संचालक शिरीष संखे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे आर्थिक क्षेत्राला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नीती आयोगाने ‘ग्रोथ हब’ उपक्रमात पुणे महानगर प्रदेशाचा समावेश केला आहे. त्याअंतर्गत प्रारूप बृहत आर्थिक विकास आराखडा लवकरात लवकर आयोगाला सादर करायचा आहे. त्यादृष्टीने पुणे व परिसरातील सध्याच्या आर्थिक क्षमता, उपलब्ध सुविधा, परिसराची बलस्थाने आदींची माहिती जमा करतानाच भविष्यातील आव्हाने, सुधारणा अपेक्षित असणाऱ्या बाबी यांची माहिती जमा करून सर्वंकष आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, हे सर्वेक्षण आपल्या जीवनात भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्यादृष्टीने होत असल्याची भावना नागरिक तसेच सर्व घटकांमध्ये तयार होईल अशा पद्धतीचा विचार सर्वेक्षण नमुना तयार करताना करण्यात यावा. तसेच जमा करण्यात येणाऱ्या माहितीची अचूकता व गुणवत्ता यावर सर्वाधिक भर देण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी मनपा आयुक्त श्री. राम म्हणाले, पुणे हे वाढत असलेले शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग आलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना विस्तारासाठी अधिक सुविधा मिळतील याबाबत विचार करणे आवश्यक आहे. पुण्याचा आर्थिक वाढ सध्याच्या 5 ते 6 टक्क्यावरून 10 टक्यात च्यावर नेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षणात उद्योगांना महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक आहे. उद्योगांच्या वृद्धीसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) सारखी पुण्यासाठी कशी आणता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

श्री. संखे यांनी सादरीकरण केले. नीति आयोगाने यापूर्वी देशभरातील पहिल्या टप्प्यातील ४ शहर – मुंबई महानगर, सुरत, वाराणसी, विशाखापट्टणम शहरांसाठी ‘ग्रोथ हब’ आर्थिक विकास आरखडा तयार केला असून मुंबई व सूरत मध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरूवात झाल्याचे सांगितले. पुण्याचा आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने सर्व संबंधित भागधारक घटकांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वेक्षण नमुना लवकर तयार करून सर्व विभागांना माहिती जमा करण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीस पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महामेट्रो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रदुषण नियंत्रण महामंडळ आदींच्या अधिकाऱ्यांसह पुणे इंटरनॅशनल सेंटर, मॅकेन्झी

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00