Home पुणे सेनको गोल्ड अँड डायमंड्सने नवरात्रीपूर्वी केले पुण्यातील नवीन शोरूमचे उद्घाटन

सेनको गोल्ड अँड डायमंड्सने नवरात्रीपूर्वी केले पुण्यातील नवीन शोरूमचे उद्घाटन

मराठी मुलगी’ तेजस्वी प्रकाशच्या हस्ते पुण्यातील शोरूमचे लोकार्पण – परंपरा, कारागिरी आणि नव्या सुरुवातींचा उत्सव

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पुणे
संस्कृती आणि कारागिरीचा सुंदर संगम साधत, सेंको गोल्ड अँड डायमंड्सने आपले नवे शोरूम पुण्यात सरसन प्लाझा, लक्ष्मी रोड, नारायण पेठ येथे नवरात्रीच्या आदल्या दिवशी उद्घाटित केले. शहरात घटस्थापना आणि उत्सवांच्या रंगतदार तयारीदरम्यान हा शुभारंभ पार पडला.
४,५८६ चौ.फुटांमध्ये पसरलेले हे नवे शोरूम सेंकोच्या वाढत्या राष्ट्रीय उपस्थितीचे प्रतीक आहे. शक्ती, समृद्धी आणि नव्या सुरुवातींचा उत्सव असलेल्या नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या उद्घाटनाने विश्वास, परंपरा आणि कालातीत डिझाइन या सेंकोच्या मुल्यांना अधोरेखित केले.
गेल्या अनेक दशकांपासून सेंको गोल्ड अँड डायमंड्सने आपल्या अप्रतिम कारागिरी, कलात्मकता आणि प्रादेशिक परंपरांचा सखोल अभ्यास या सर्वांचा सुंदर संगम साधून ग्राहकांची मने जिंकली आहेत. पारंपरिक ते आधुनिक, हलक्या दागिन्यांपासून ते समारंभासाठीच्या जड सेट्सपर्यंत – सोनं, हिरे आणि प्लॅटिनममध्ये सेंकोच्या डिझाइन्स प्रत्येक शैली आणि प्रत्येक प्रसंगासाठी खास ठरतात.
या शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्राची लेक आणि प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत सुवंकर सेन, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, सेंको गोल्ड अँड डायमंड्स तसेच धवल राजा, मुख्य महाव्यवस्थापक (विक्री), सेंको गोल्ड अँड डायमंड्स उपस्थित होते. तेजस्वी प्रकाश यांनी सेंकोच्या खास दागिन्यांत सजून फित कापून उद्घाटन केले आणि शोरूमची सफर घडवली.
उद्घाटनप्रसंगी तेजस्वी प्रकाश म्हणाल्या, “लहानपणापासून नवरात्रीचा रंगीबेरंगी उत्सव साजरा करत मोठी झाल्याने आज येथे उपस्थित राहणे माझ्यासाठी अतिशय खास आहे. सेंकोची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम. रोजच्या वापरासाठी सोन्याचे हलके दागिने असोत वा ठसठशीत हिर्‍यांचे सेट्स – प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक क्षणासाठी सेंकोकडे काहीतरी खास आहे. माझ्या मराठी मुळांशी नाळ जुळवतानाच भारतभरातील विविध डिझाइन शैलींचा गौरव करणारा ब्रँड पाहून मला अभिमान वाटतो.”
सुवंकर सेन, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, सेंको गोल्ड अँड डायमंड्स म्हणाले, “पुणे हे असे शहर आहे जेथे संस्कृती, सर्जनशीलता आणि कारागिरीला खूप मान आहे – आणि हेच आमच्या ब्रँडचे सार आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला येथे नवे शोरूम सुरू करणे आमच्यासाठी विशेष अर्थपूर्ण आहे. ही वाढ, विश्वास आणि परंपरेची एकत्रित साजरी आहे. महाराष्ट्राने आणि विशेषतः पुणेकरांनी आमच्या ब्रँडला ज्या आत्मीयतेने स्वीकारले त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”
जोइता सेन, संचालिका, सेंको गोल्ड अँड डायमंड्स यांनी सांगितले, “८५ वर्षांची परंपरा आणि देशभरातील १८५ हून अधिक शोरूम्ससह सेंको आज विविध संस्कृती आणि परंपरांशी जोडले गेले आहे. पिचोदी, पाटल्या यांसारख्या पारंपरिक मराठी डिझाइन्सपासून ते आधुनिक हिर्‍यांचे ब्राइडल सेट्स, चार्म ब्रेसलेट्स, इव्हिल आय कलेक्शन आणि दैनंदिन वापरासाठीचे हलके दागिने – आमच्या डिझाइन्स परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम साधतात. कोलकात्यातील आमचे कुशल कारागीर घडवलेले हे दागिने पिढ्यान्पिढ्या टिकणारी कारागिरी जपतात. पुण्यातील हे नवे शोरूम ग्राहकांना हा संपूर्ण अनुभव एका छताखाली देईल.”
या नव्या शोरूममध्ये वधू-वर, उत्सव, आधुनिक तसेच दैनंदिन वापरासाठी सोनं, हिरे, प्लॅटिनम आणि खास नवरात्री कलेक्शन उपलब्ध आहे. हलक्या-नाजूक डिझाइन्सपासून ते समृद्ध व देखण्या सेट्सपर्यंत, सेंकोचे दागिने प्रत्येक सणाला आणि प्रत्येक क्षणाला अधिक तेज देतात.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00