अलिकडच्या काही दिवसात बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढलेला दिसुन येत आहे. दौड तालुक्यातील बहुतांश गावा मध्ये मोठया प्रमाणात ऊसाचे उत्पन्न घेतले जाते, त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर या भागात जास्त आहे. वन विभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावतात परंतू त्यात बिबट्या सारखे जंगली प्राणी अडकण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
आज सकाळी कामटवाडी मधील नागरीकांना मृत बिबट्याचे दर्शन झाले रेल्वेच्या धडकेने बिबट्याचे अनेक अवयव शरीरापासून वेगळे झालेले दिसुन येत होते. येरवी बिबट्याचा परिसरातील वावरा मुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरते आज तेच नागरीक मृत बिबट्याचा जवळ जाऊन फोटो टिपताना दिसुन येत होते.
तसेच सदर ठिकाणी कामटवाडी गावाचे पोलीस पाटील सौ.ज्योती सुभाष भिसे यादेखील घटनास्थळी उपस्थित होत्या त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की कामटवाडी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील पाळीव प्राण्यांचे संरक्षण करून तसेच रात्रीच्या वेळेस बाहेर न फिरता सतर्क राहण्यास सांगितले आहे, तसेच बाहेर फिरताना बॅटरी , काठी तसेच सोबत अजून एक जोडीदार असे बाहेर पडावे एकट्याने बाहेर न पडणे तसेच रात्रीच्या वेळेस आपल्या जवळील पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे, आणि कोणालाही आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्या किंवा जंगली प्राणी आढळल्यास तात्काळ गावातील नागरिकांना कळवणे तसेच वन विभागाला याची कल्पना त्यांच्या हेल्पलाइन नंबर वरून देणे, सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन कामटवाडी पोलीस पाटील.ज्योती सुभाष भिसे यांनी यावेळेस केले आहे.
