Home पिंपरी चिंचवड महाविजयाचे श्रेय जनतेच्या आशीर्वादाला – शंकर जगताप

महाविजयाचे श्रेय जनतेच्या आशीर्वादाला – शंकर जगताप

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

सांगवी
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी मतदारांचे आभार मानले. पिंपळे गुरव, नवी सांगवी, आणि सांगवी परिसरातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाने आणि प्रेमाने आपले मन भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
“आपल्या सन्मानाने आणि प्रेमाने मी धन्य झालो आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्यानेच आज चिंचवड विधानसभा महाविजयाचा साक्षीदार ठरला आहे,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, “या विजयामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, युवक-युवती, मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक, माझ्या सहकारी मंडळी आणि विशेषतः मायमाऊलींचा मोलाचा वाटा आहे. या परिसरातील सर्वांगीण विकासासाठी तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे, आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.”

शिक्षण, रोजगार, आरोग्य, अध्यात्म, आणि क्रीडा क्षेत्रात चिंचवडला उत्तुंग भरारी देण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. “आपल्या सहकार्यामुळे चिंचवड विधानसभा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आणि आदर्श मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाषाप्रभू हभप पंकज महाराज गावडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, माजी नगरसेविका उषा मुंढे, शारदा सोनावणे, सुषमा तनपुरे, वैशाली जवळकर, सोनाली जम, चंदा लोखंडे, पोपटआण्णा जगताप, विलासतात्या जगताप, मधुकर रणपिसे, सुरेश तावरे, दिलीप तनपुरे, बाळासाहेब देवकर, सूर्यकांत गोफणे, संतोष कलाटे, भाजपा उपाध्यक्ष जवाहर ढोरे, स्वीकृत नगरसदस्य महेश जगताप, राहुल जवळकर, शाम जगताप, तानाजी जवळकर, रमेश काशीद, नरेश जगताप, नवनाथ जांभुळकर, अमरसिंग आदियाल, शशिकांत दुधारे, सखाराम रेडेकर, महेश भागवत, सुरेश शिंदे, राजेश लोखंडे, संतोष ढोरे, पल्लवीताई जगताप, मंदाकिनी तनपुरे, शोभाताई जांभूळकर, तृप्तीताई कांबळे, दुर्गाताई आदियाल, पंचशीलाताई दुधारे, संतोष कदम, बीरबल सूर्यवंशी, शिवाजी कदम, गणेश कदम, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, श्रीकृष्ण फिरके, कुमकर, लक्ष्मण पवार, अंकुश सकुंडे, सुभाष जाधव, अजय दुधभाते, सागर फुगे, ललित म्हसेकर, उमेश बोरसे, सुभाष जावळे, संभाजी शिंदे, प्रदीप गायकवाड, हभप बब्रुवाहन महाराज वाघ, संदीप दरेकर, शशिकांत नागणे, सुनील कोकाटे, उमेश झरेकर, संजय मराठे, कैलास बनसोडे, प्रितम गोत्रे, अमित पवार, शंकर गंगे, अशोक कवडे, उद्धव कवडे, जयराम देवकर, आदेश नवले, दिलीप कांबळे, गौतम रोकडे, पुनाजी रोकडे, प्रल्हाद जरांडे, नामदेव तळपे, वाळके सर, अविनाश जाधव, डॉ.देविदास शेलार, कृष्ण भंडलकर, अॅड.सुदाम मराडे, कृष्णा भालचिम, गौतम डोळस, प्रवीण धीवर, सुरेश सकट, शरद देसले, सुभाष पलांडे, प्रशांत कडलग, कुणाल कदम, सचिन सोनावणे, सुनील देवकर यांच्यासह सर्व महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच पिंपळे गुरव, नवी सांगवी आणि सांगवी परिसरातील सर्व सामाजिक संस्था, मंडळांचे अध्यक्ष, गृहनिर्माण सोसायटी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00