सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दि. ३१ ऑक्टो. रोजी विशेष परिसंवाद

पुणे

देशाचे लोहपुरूष अशी ओळख असणारे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल (चरित्र व काळ)’ या पुस्तकावर आधारित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पहिले अध्यक्ष स्व. मामासाहेब देवगिरीकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर हा परिसंवाद शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक मार्ग पुणे येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित या परिसंवादात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे  प्राध्यापक व ज्येष्ठ लेखक प्रकाश पवार हे प्रमुख वक्ते असणार आहेत. संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

Please follow and like us:

Related posts

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

अंतर्मनीचे भाव तरंग” या ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई