लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे

 जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

 राज्य शासनाच्यावतीने लघु उद्योजकाना जिल्हा पुरस्कार 2023 व जिल्हा पुरस्कार 2024 देण्यात येणार आहे. जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये व व्दितीय पुरस्कार 10 हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग 2उद्योग आधारउद्यम रजिस्ट्रेशन हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नॉदणीकृत असावा. 1 जानेवारी 2020 पूर्वीची नोंदणी उद्योगआधार,उद्यम रजिस्ट्रेशन तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगाची निवड करण्यात येणार आहे.

 इच्छुकांसाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्रकृषी महाविद्यालयशिवाजीनगर येथे विनामुल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापकजिल्हा उद्योग केंद्रपुणे यांचे कार्यालयकृषि महाविद्यालय आवारशिवाजीनगरपुणे (दूरध्वनी क्रमांक 020-25539587,25537541) यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Related posts

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

अंतर्मनीचे भाव तरंग” या ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई