“राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार.” – दत्तात्रय भरणे

‘योजनेचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश

पुणे

कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. तसेच नैसर्गिक संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी या कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

हे निर्देश त्यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी  राबविण्यात येत असलेल्या कृषी समृद्धी योजनेचा आढावा बैठक प्रसंगी दिले. आज पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत कृषी समृद्ध योजनेची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत योजनेंतर्गत होत असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकर्‍यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ही योजना सुरु केली असून कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आढावा घेण्यात आला. या योजनेतर्गत दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. तर, पाच वर्षात २५ हजार कोटींचा निधी शेतकर्‍यांच्या कृषी योजनांसाठी देण्यात येणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधिकरण करणे, मूल्यसाखळी बळकट करणे, हवामान अनुकूल व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने योग्य त्या उपयोजना करण्याचे आदेश दिले.

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसंच  हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं हे कृषी समृध्दी योजनेचं उद्दिष्ट आहे.

या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त पुणे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ चे प्रकल्प संचालक, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरु आणि कुलसचिव, विस्तार/आत्मा/निविष्ठा व गुणनियंत्रण/शिक्षण/साधनसामुग्री विकासचे सर्व संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी औद्यो गिकविकास महामंडळाचे उप व्यवस्थापक/जनरल मॅनेजर, कृषी विभागाचे उपसचिव आणि सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Related posts

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे