पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होती, तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे.

नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असून इतर मजकूरही ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Please follow and like us:

Related posts

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे