जि प निवडणुकीतही भाजपची आघाडी 

पुणे 
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाने मोठे मुसंडी मारली आहे. याही निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून 236 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. पुणे जि प मात्र अजित दादा पवार यांच्या गटाकडे गेली आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी 51 जागांवर विजय मिळवलेला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 731 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी 236 जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय संपादन केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने दीड शतकी विजय मिळवून आपली ताकत दाखविलेली आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 160 चा आकडा गाठला असून तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 40 जागांवर समाधान मानावे लागले आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 25 चा आकडा गाठता आलेला नाही. मनसेने दोन जागांवर विजय मिळवून आपले अस्तित्व शिल्लक ठेवले आहे. तर काँग्रेस पक्षाने 50 ठिकाणी विजय संपादन केलेला आहे.
पुणे जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवलेले आहे . या पक्षाने 51 जागांवर विजय संपादन केला आहे. पुण्यामध्ये भाजपा हा दुसरा पक्ष ठरला आहे यांनी दहा ठिकाणी विजय संपादन केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागांवर विजय संपादन करता आला आहे. काँग्रेस आणि मनसे या दोन्ही पक्षांना पुण्यामध्ये खातेही उघडता आलेले नाही.
Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप