banner

latest in fashion

  • पिंपरी  मावळातील पवना धरण परिसरातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत आंदोलनात सहभागी शेतकरी आणि प्रशासनाबरोबर सोमवारी समन्वय बैठक झाली. या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने संपूर्णा …

  •  भाजपाचे विकास डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार  आर्थिक नुकसानभरपाई, नोकरी, घर, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी पिंपरी-चिंचवड  मोशी येथील कचरा डेपो परिसरात अतिवृष्टीमुळे लँडफिलचा काही भाग खचून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने …

  • मुंबई  राज्यातील वनसंपत्तीचे संरक्षण, बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा, वनमाफियांविरोधातील कारवाई आणि वन विभागाची कार्यक्षमता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत तारांकित …

  • पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता करावर जाहीर करण्यात आलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही शेवटची मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. ३० जूननंतर या सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वीच मालमत्ता कराचा भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन महापालिकेने केले आहे.   महापालिका हद्दीत सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटींहून अधिक मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख  ४६ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत योजनेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उर्वरित मालमत्ताधारकांनीही ३० जूनपूर्वी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.   तसेच, १ जुलैपासून मालमत्ता कर वसुली मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार आवाहन करून तसेच जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास हा आपल्या सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. नागरिकांनी भरलेला प्रत्येक रुपया शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि विविध विकासकामांमध्ये खर्च केला जातो. त्यामुळे ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर सवलतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकाने लाभ घ्यावा.  रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका  महापालिकेच्या उत्पन्नातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या सुविधांमध्ये आणि शहराच्या विकासकामांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे मालमत्ता कराची वेळेत वसुली ही महापालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना अधिक लाभ मिळावा म्हणून ३० जून २०२६ पर्यंत १० टक्के सवलत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आली आहे. या अंतिम संधीचा लाभ घेत नागरिकांनी कराचा भरणा करावा. यानंतर महसूल वसुलीच्या नियोजनानुसार विशेष मोहीम राबविण्यात येईल.  डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका  मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटची संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा. १ जुलै २०२६ पासून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई करण्यात येईल.   सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका   

  • मुंबई श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून,  ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा …

  •  लाभार्थ्यांना वेळेवर सेवा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा मुंबई / पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३२ लाख नागरिकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न विधानसभेत चर्चेत आला. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज विधानसभेत …

banner

healthy living

banner
banner

Latest Posts

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00