महापालिका, प्राधिकरण प्रशासनाला केली सूचना राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत तात्पुरत्या निधीची तजवीज करा पिंपरी-चिंचवड पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड-राजगुरूनगर मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका …
latest in fashion
-
-
पिंपरी-चिंचवड मुंबई/पिंपरी-चिंचवड, 23 जून 2026: पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर आणि शाहूनगर येथील एमआयडीसीच्या (MIDC) हजारो जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा आणि तिथल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भाजप आमदार अमित गोरखे यांनी चालू विधिमंडळाच्या पावसाळी …
-
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधी समिती सदस्य तथा नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे, नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे, सिताराम बहुरे, संदीप खोत, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये सुरक्षा रखवालदार यांच्या पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. यापूर्वी जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील, त्यांना सुरक्षा सुपरवायझर या पदावर पदोन्नती देण्यात येत होती. तसेच पात्र सुरक्षा सुपरवायझर यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती दिली जात होती. मात्र विधी समितीने आता सुरक्षा सुपरवायझर व सुरक्षा निरीक्षक या दोन्ही पदांचे समायोजन करून सुरक्षा निरीक्षक हे एकच पद ठेवून त्यावर पात्र सुरक्षा रखवालदार यांना पदोन्नती देण्याबाबत ठराव केला आहे. याशिवाय बैठकीत होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट, महापालिकेची महसूलवाढ, महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या उपलब्ध जागा आदींबाबत चर्चा करण्यात आली.
-
पिंपरी जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, त्याअनुषंगाने देशात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत. ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना व सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती… शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटिंग, व्हि.एम.डी डिस्प्ले (VMD), सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “पोलिओमुक्त भारताचे यश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. रविवार, दि. २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.” डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका …
-
पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने वेधले लक्ष मुंबई कोरोना काळातील आर्थिक फटका, वाढते खर्च, परवानग्यांची गुंतागुंत आणि रोजगाराच्या अस्थिरतेचा सामना करणाऱ्या मंडप व्यवसायाला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत. राज्यातील लाखो कुटुंबांचा …
-
पुणे एकल महिलांना नियमित मार्गदर्शन देण्यात यावे. त्यांच्या बाबत सुरु असलेल्या अमानवी प्रथा मंगळसूत्र काढणे , टिकली न लावणे यासारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी …
healthy living
Featured Videos In This Week
पिंपरी ‘बदलत्या काळात नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे हताश होऊन चालणार नाही. त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एआयच्या जगातही …
पिंपरी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी …
Latest Posts
-
पिंपरी चिंचवड
शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन
पिंपरी पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स , महावितरण / टेलिफोन डीपी वर चिटकवलेल्या …
-
पिंपरी चिंचवड
नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ – महापौर रवि लांडगे
पिंपरी नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे,या यशामागे करसंकलन विभागातील सर्व अधिकारी व …
-
पिंपरी चिंचवडताज्या घडामोडी
पिंपळे निलख येथिल अनधिकृत RMC प्लॅन्टची धुळ दिली पालिका अधिकाऱ्यांना भेट
पिंपळे निलख पिंपळे निलख येथील CNG पंपच्या मागे असणाऱ्या ग्रेस्टोंन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅन्ट असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागास …
-
पिंपरी चिंचवडताज्या घडामोडी
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर – महापौर रवि लांडगे
स्थानिक रहिवाश्यांना मिळणार विविध सोईसुविधा… पिंपरी शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा …
-
महापालिकेत आढावा बैठक पिंपरी शहरात किती विकास कामे केले, नवीन प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य, स्वच्छता या मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात हे …
-
पिंपरी चिंचवड
अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई; ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे निष्कासन
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील वृंदावन कॉलनी, रहाटणी तसेच तापकीर मळा चौक, तापकीर नगर, रहाटणी या परिसरांमध्ये आज अनधिकृत …
-
पिंपरी चिंचवड
वेस्ट टू एनर्जी, प्लास्टिक टू फ्युएल, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस, बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया व बायोमायनिंग साईटची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली पाहणी
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी येथील विविध प्रकल्पांना भेट देत कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी आयुक्त यांनी वेस्ट टू एनर्जी …
-
समाज विकास विभागाच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पिंपरी महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला स्वतः सक्षम …
-
पिंपरी चिंचवड
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. …
-
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू असून नागरिकांना अधिक सोयीस्कर पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध …

