Home पुणे एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा : महापौर मंजुषा नागपुरे

एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा : महापौर मंजुषा नागपुरे

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

एकल महिलांना नियमित मार्गदर्शन  देण्यात यावे. त्यांच्या बाबत सुरु असलेल्या अमानवी प्रथा मंगळसूत्र काढणे , टिकली न लावणे यासारख्या  प्रथा बंद झाल्या पाहिजेत. एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा, असे आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी बोलताना केले.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दि.23/06/2026 रोजी दत्त  मंदिर, शास्त्रीनगर, कोथरूड येथे   एकल महिला दिन सन्मान महिलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा अल्पनाताई वरपे यांनी ‘एकल महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान दिले गेले पाहिजे, तसेच मुख्य प्रवाहात अन्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे’ या विषयी मार्गदर्शन केले.

एकता ग्राम विकास संस्थेचे नंदकिशोर लोंढे यांनी राज्य स्तरावर काम सुरु असलेल्या एकल महिला विकास समिती विषयी महिलांना माहिती दिली.

यावेळी बोलताना समाज विकास विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी एकल महिलांच्या विकासासाठी महापालिका कायम दक्ष राहणार असल्याचे सांगितले तसेच महिला सन्मान कार्यक्रम संपूर्ण पुणे शहरात 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये घेण्यात आल्याचे माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी पुणे शहराचे महापौर मा. मंजुषा नागपुरे, मा. श्रीमती अल्पना वरपे अध्यक्षा,  महिला बाल कल्याण समिती, वासंती ताई जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, मा.रूपाली ताई पवार नगरसेविका,समाज विकास विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण  तसेच समुपदेशिका, अनुराधा जगताप सर्व समूह संघटिका मनिषा वाघ, शीतल ठोसर, स्वाती ढगे, विजया हिंगणे समाजसेवक  निजाम शेख, सेवा केंद्र मुख्य समन्वयक विजय पाटोळे, संगीता निकम तसेच कोथरूड भागातील सर्व महिला व एकल महिला साधारण 200 ते 350 महिला सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

यावेळी श्रीमती भाग्यश्री साळुंखे ॲड.प्रीती परांजपे यांनी एकल महिलांची सामाजिक स्थिती व कायदे व हक्क या विषयावर महिलांसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी महिलांना शासन योजना, आयुष्मान भारत योजना, आभा कार्ड लाइट हाऊस व योजक संस्था मार्फत विविध कोर्स, विषयक माहिती देण्यात आली.

तसेच उपस्थित एकल महिलांचा सत्कार करून रामदास चव्हाण यांनी आभार मानले व सूत्रसंचालन अनुराधा जगताप यांनी केले.

उपस्थिताना अल्पोपहार देऊन एकल महिला सन्मान दिन साजरा करण्यात आला.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00