Pawanasamachar@gmail.com

देशभरात सहावे स्थान मिळवून ‘डीपीयू’ने राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा; संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये घवघवीत यश!

पिंपरी शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) प्रतिष्ठित अशा ‘टाइम्स हायर एज्युकेशन सस्टेनेबिलिटी…

Read more

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई भाजपा सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ व कुचकामी आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यातच हे सरकार आघाडीवर असून यांना एक परिक्षाही धड घेता येत नाही. नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात रविवार…

Read more

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांच्या उपजीविकेला बळ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना  वितरण करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी,…

Read more

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

पुणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या…

Read more

नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा!

 महापालिका, प्राधिकरण प्रशासनाला केली सूचना  राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत तात्पुरत्या निधीची तजवीज करा पिंपरी-चिंचवड पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड-राजगुरूनगर मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…

Read more

MIDC इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अधिवेशनात ऐरणीवर; लिफ्ट नाही, इमारती जीर्ण… आमदार अमित गोरखेंनी सभागृहात मांडली वृद्ध कामगारांची व्यथा

पिंपरी-चिंचवड मुंबई/पिंपरी-चिंचवड, 23 जून 2026: पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर आणि शाहूनगर येथील एमआयडीसीच्या (MIDC) हजारो जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा आणि तिथल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भाजप आमदार अमित गोरखे यांनी चालू विधिमंडळाच्या पावसाळी…

Read more

सुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव 

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.    या बैठकीला विधी समिती सदस्य तथा नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे, नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे, सिताराम बहुरे, संदीप खोत, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   बैठकीमध्ये सुरक्षा रखवालदार यांच्या पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. यापूर्वी जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील, त्यांना सुरक्षा सुपरवायझर या पदावर पदोन्नती देण्यात येत होती. तसेच पात्र सुरक्षा सुपरवायझर यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती दिली जात होती. मात्र विधी समितीने आता सुरक्षा सुपरवायझर व सुरक्षा निरीक्षक या दोन्ही पदांचे समायोजन करून सुरक्षा निरीक्षक हे एकच पद ठेवून त्यावर पात्र सुरक्षा रखवालदार यांना पदोन्नती देण्याबाबत ठराव केला आहे. याशिवाय बैठकीत होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट, महापालिकेची महसूलवाढ, महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या उपलब्ध जागा आदींबाबत चर्चा करण्यात आली.

Read more

रविवार दि. २८ जून रोजी शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’ 

पिंपरी जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, त्याअनुषंगाने देशात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.    याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.   या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत.   ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना व सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती…    शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील.   सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.   मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटिंग, व्हि.एम.डी डिस्प्ले (VMD), सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “पोलिओमुक्त भारताचे यश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. रविवार, दि. २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”  डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका …

Read more

राज्यातील मंडप व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या!

 पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने वेधले लक्ष मुंबई  कोरोना काळातील आर्थिक फटका, वाढते खर्च, परवानग्यांची गुंतागुंत आणि रोजगाराच्या अस्थिरतेचा सामना करणाऱ्या मंडप व्यवसायाला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत. राज्यातील लाखो कुटुंबांचा…

Read more

एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा : महापौर मंजुषा नागपुरे

पुणे एकल महिलांना नियमित मार्गदर्शन  देण्यात यावे. त्यांच्या बाबत सुरु असलेल्या अमानवी प्रथा मंगळसूत्र काढणे , टिकली न लावणे यासारख्या  प्रथा बंद झाल्या पाहिजेत. एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी…

Read more