पिंपरी व चिंचवड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांचा महापालिकेच्या वतीने सन्मान

पिंपरी पारंपरिक वेशभुषेत कलाकारांनी सादर केलेला ढोल-ताशांचा गजर… रांगोळीच्या पायघड्या…आणि फुलांची उधळण… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड येथे गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (६ सप्टेंबर) पार पडली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  स्वागत करण्यात आले. गणेशभक्तांच्या भक्तिभावाचा सन्मान करण्यासाठी तसेच मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनातून पिंपरीतील कराची चौक व चिंचवडमधील हुतात्मा चापेकर चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आलेले होते. हुतात्मा चापेकर चौकातील स्वागत कक्षातून यंदा एकूण ३१ गणेश मंडळांनी सत्कार स्वीकारला. या कक्षामध्ये सर्वात प्रथम अजिंक्य मित्र मंडळ सायंकाळी ५.१० वाजता दाखल झाले, तर अखेरचे मोरया गोसावी क्रीडांगण मित्र मंडळ रात्री ११.५५ वाजता दाखल झाले. येथील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध कलापथकांनी सादर केलेले ढोल ताशांचे चित्तथरारक पारंपरिक खेळ,विद्युत रोषणाईने सजविलेले रथ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून केलेली आरास नागरिकांना मंत्रमुग्ध करत होती. पिंपरीत मिरवणुकीचा उत्साह कराची चौकातील स्वागत कक्षातही सत्कार स्वीकारण्यासाठी मंडळांची लगबग होती. पिंपरी मिरवणुकीतील अखेरचे मंडळ रात्री ११.४५ वाजता येथे दाखल झाले. या कक्षामध्ये एकूण २९ मंडळाचे स्वागत करण्यात आले.…

Read more

सुखाच्या क्षणांसाठी धीर धरावा लागतो 

देहू  आयुष्यात सुखदुःखाचे क्षण हे ठराविक काळा पर्यंतच येत असतात. सुखाच्या क्षणांसाठी काही काळ धीर धरावा लागतो असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक सचिन दादा पवार यांनी व्यक्त केले. अभंग प्रतिष्ठान,…

Read more

बोपोडीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

औंध   पुणे महानगरपालिका मार्फत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत शेल्टर असोसिएट्स व इकोसन सर्विसेस फाउंडेशन या समाजसेवी संस्थांच्या  संयुक्त विद्यमाने बोपोडी येथील शांता आपटे…

Read more

 उद्योग-व्यवसायासाठी कर्ज देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज…

Read more

मुख्यमंत्र्यांचे गौरव सोहळा – ‘फिनिक्स’ विशेष सन्मान सोहळा आयोजित

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय राजकीय व प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, ८ सप्टेंबर २०२५…

Read more

केंद्रीय मुख्याध्यापक माधव रेडेवाड बरबडेकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार प्रदान

नांदेड  – राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने मौजे बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपक्रमशिल केंद्रीय मुख्याध्यापक तथा माजी प्रभारी केंद्र प्रमुख माधव विठ्ठलराव रेडेवाड बरबडेकर यांना त्यांच्या…

Read more

गजानन महाराज मंदिरात कीर्तन महोत्सव 

निगडी  प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने गेली १० वर्षांत सुमारे वारकऱ्यांना मोफत चहा वाटप करणारे किशोर पवार आणि वारकऱ्यांची मालिश करून सेवा करणारे हभप मच्छिंद्र महाराज…

Read more

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी!

 १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि मुख्याध्यापकांना पदोन्नती पिंपरी-चिंचवड शिक्षक दिनाची पूर्व संध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले…

Read more

पिंपरीत पर्यावरणपूरक सामूहिक गणेश विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करुन बनविणार कुंंड्या पिंपरी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा उत्सव असून, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी पिंपरीत एक प्रशंसनीय उपक्रम राबवला जात आहे. ॲस्पिरिफाय एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट…

Read more

शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी 22 हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा –  अजित पवार

पुणे महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक…

Read more