मुख्यमंत्र्यांचे गौरव सोहळा – ‘फिनिक्स’ विशेष सन्मान सोहळा आयोजित

मुंबई
मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय राजकीय व प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता, नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडणार आहे.
मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मते, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात व प्रशासनात नव्या पर्वाची सुरुवात केली असून त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि प्रामाणिकतेची दखल घेऊन हा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.”
या सन्मान सोहळ्यात जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विशेष सन्मान प्रदान केला जाणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
प्रेरणादायी ‘फिनिक्स’ व्हिडिओ बुकचे प्रकाशन
या सन्मान सोहळ्याच्या विशेष प्रसंगार्थ प्रेरणादायी ‘फिनिक्स’ व्हिडिओ बुकचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. या व्हिडिओ बुकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे, निर्णयक्षमतेने उभे राहिलेले नवे उपक्रम व महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान प्रभावीपणे दाखवले जाणार आहे.
सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सन्मानाचे साक्षीदार बनणार आहेत.
Please follow and like us:

Related posts

महाराष्ट्र लोक भवन में मनाया गया तेलंगाना राज्य स्थापना दिवस

संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज करिता प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता