सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (नविन), गुणवडी ता. बारामती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह  सासवड ता. पुरंदर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह तळेगाव दाभाडे येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ७ वी नंतर शालेय शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचित जातीमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना  मोफत शासकीय वसतिगृह प्रवेश देण्यात येणार आहे.

वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय आरक्षण व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, आंथरूण-पांघरूण, भोजन सुविधा, पुस्तके, स्टेशनरी, विविध शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशासंबंधित सूचना वाचून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन वस्तीगृहाच्या गृहपालाकडून करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Related posts

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

अंतर्मनीचे भाव तरंग” या ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई