Home ताज्या घडामोडी सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांच्या उपजीविकेला बळ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना  वितरण करण्यात आले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, पुणे येथे आयोजित कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे माजी अध्यक्ष, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, संत रोहिदास समाज उन्नती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजू रतन बनसोड,संत रोहिदास महामंडळाचे  विभागीय अधिकारीअमोल शिंदे, गटई स्टॉलचे लाभार्थी उपस्थित होते.

श्री. लोंढे म्हणाले, शासनाच्या या उपक्रमामुळे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील लाभार्थींना स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस चालना मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थींना व्यवसाय सुरू किंवा विस्तार करण्यासाठी आवश्यक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले, असेही श्री. लोंढे यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा व लाभार्थ्यांचा सन्मान संविधानाच्या उद्देशिकेची प्रेम व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तदनंतर विशेष अधिकारी श्रीमती माधुरी वाघमोडे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर लाभार्थी अमोल शिंदे व संजय भाऊ बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र लोहार यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. अमोल शिंदे, व्यवस्थापक चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ यांनी केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00