Home पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांनी ध्येयवादी रहावे

विद्यार्थ्यांनी ध्येयवादी रहावे

खासदार श्रीरंग बारणे यांचा सल्ला, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी 

 थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने  दहावी व बारावी २०२६  मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५००  विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे आणि वीण दोघांतली हि तुटेना (आधीरा )  या मराठी मालिकेतील अभिनेत्री पोर्णिमा डे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ध्येयवादी रहावे, असा सल्ला खासदार बारणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

चिंचवड येथील चिंचवडे लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाला  युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ,शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, शिवसेना महिला उपनेत्या, नगरसेविका  सुलभा उबाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख तथा नगरसेवक निलेश तरस, महिला जिल्हा संघटीका शिलाताई भोंडवे ,उपजिल्हा महिला संघटीका शैलाताई निकम, जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस , सागर पाचरणे, शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेविका विमल जगताप, युवती सेनेच्या श्वेता कापसे , युवती सेना जिल्हा संघटिका सायली साळवी, श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिलीप बोंबले पाटील,  संचालक हनुमंत माळी, धनाजी बारणे, अनंत येळवंडे, दिपाली गुजर, व मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘अतिशय स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची क्षमता ठेवावी. आई-वडील हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण देत आहेत. त्याची जाणीव ठेवून अभ्यास करावा. आताच्या काळात केवळ पदवी मिळण्यास महत्व देऊ नये, बौद्धिक, व्यावसायिकही ज्ञान घेतले पाहिजे. शिक्षणाला मर्यादा नाही. गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.  प्रत्येकाच्या अंगात काही, तरी सुप्त गुण असतात. कला असते. ते ओळखून ध्येय ठेऊन वाटचाल करावी. ध्येयवादी रहावे. त्यादृष्टीकोनातून शिक्षण निवडावे आणि त्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत’.

विश्वजीत बारणे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ अध्यात्माला महत्व द्यावे. आपण कोणते क्षेत्र निवडावे हे आपण स्वत: ठरवावे. सायन्स, इंजिनियरी ,कला ,वाणिज्य या कोणत्याही क्षेत्राची निवड करावी. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या संधी आहे. पण आपणास काय करावयाचे ते ठरावा.  झोकून देवून अभ्यास करा. आपल्यासाठी आपल्या घरातील सर्वाचे कष्ट  त्यामागे असतात, त्यांना विसरू नका’. ‘उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची सख्या जास्त आहे. खासकरून मुलीनी स्वसंरक्षणवर भर द्यावा, असे सुलभा उबाळे म्हणाल्या.

पोर्णिमा डे यांनी संस्थेच्या वतीने असा उपक्रम दरवर्षी घेतला जातो, त्याबद्दल कौतुक केले, संस्थेचे  आभार मानले . मी शिक्षण घेत असताना टॉपर होते. मला कला क्षेत्राची आवड होती म्हणून ते निवडले. त्यामध्ये मी  सध्या चांगले काम करत आहे. आमच्या वेळी असे प्रोत्साहन मिळाले असते तर मी अन्य क्षेत्रात दिसले असते, असेही त्या म्हणाल्या.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव कोंडे यांनी केले, तर धनाजी बारणे यांनी आभार मानले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00