लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळा’चे  भूमिपूजन

सांगवी

पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळ’ या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या विशेष सोहळ्याचे आयोजन उद्या, शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण, पुणे येथे करण्यात आले आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार व नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष  विजय उर्फ आप्पा रेणुसे यांच्यासह आमदार महेशदादा लांडगे, शंकर मांडेकर, अण्णा बनसोडे, उमाताई खापरे, सुनील शेळके  व अमित गोरखे यांची देखील या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल.

या सोहळ्याचे निमंत्रक माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार शंकर पांडुरंग जगताप आणि विजय पांडुरंग जगताप यांनी ही माहिती दिली.

प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेले “शक्तिस्थळ” पिंपरी-चिंचवडकरांसाठी सदैव शक्तीदायी व प्रेरणादायी ठरणार आहे.

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप