लातूरमध्ये उद्या अनुसूचित जातींतील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ विराट जनआक्रोश मोर्चा आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्यायासाठी एल्गार

लातूर 

अनुसूचित जातींतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि समान संधीच्या तत्त्वांच्या संरक्षणासाठी रविवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथे विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये विधानपरिषद सदस्य *आमदार अमित गोरखे* यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातून हजारो समाजबांधव सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात आमदार अमित गोरखे म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातींसह समाजातील वंचित घटकांना न्याय, समता आणि समान संधीचा अधिकार बहाल केला. अनुसूचित जातींसाठीचे आरक्षण हे संविधानाने दिलेले हक्क असून, त्या हक्काचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय्य पद्धतीने पोहोचला पाहिजे. अनुसूचित जातींतील उपवर्गीकरण ही त्याच सामाजिक न्यायाच्या तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी आहे.”

ते पुढे म्हणाले, “ही भूमिका कोणत्याही समाजाच्या विरोधातील नसून संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक न्याय अधिक व्यापक करण्याची आहे. अनुसूचित जाती समाजातील दीर्घकाळ वंचित राहिलेल्या घटकांनाही आरक्षणाचा समान लाभ मिळावा, हीच या जनआंदोलनामागील भूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने या विराट जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे.”

आमदार अमित गोरखे यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक विचारांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाची लढाई अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने पुढे येणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या रक्षणासाठी हा लढा असून, प्रत्येक समाजबांधवाची उपस्थिती या चळवळीला बळ देणारी ठरेल.”

हा विराट जनआक्रोश मोर्चा रविवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाईजवळ, लातूर येथून प्रारंभ होणार आहे. या ऐतिहासिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Related posts

डीएचएल एक्सप्रेसची ‘राखी एक्सप्रेस’ भारतातून आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सवर ५०% सवलतीसह परत आली आहे

‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा शेवट नाही; विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार- नसीम खान