महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे- आदिती तटकरे

मुंबई

गरजू महिलांना उद्योगपूरक साधने पुरविण्याच्या सहाय्यासोबतच उद्योग कायम टिकविणे आणि वाढविणे यासाठी आर्थिक साक्षरही करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांनी गरजू महिलांना उद्योगपूरक वस्तुंच्या वितरणाबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी अभिनंदन केले.

जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत १५७ महिलांना चर्चगेट येथील वालचंद हिराचंद हॉल येथे उद्योगपूरक वस्तुंचे वितरण महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक अनु अग्रवालबॉबकार्डचे (बँक ऑफ बडोदाची उपकंपनी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र रायमानव संसाधन प्रमुख रवी खन्नासीएसआरचे विभागीय अधिकारी विपुल बरोटयुनायटेड वे मुंबईचे उपाध्यक्ष अनिल परमारमुख्य कार्यकारी अधिकारी सना शेखव्यवस्थापकीय सहायक चिन्मय पाटील यांच्यासह अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीव्यावसायिक शिक्षण आणि उद्योग उभारणीस इच्छुक असलेल्या महिलांना आर्थिक परिस्थिती अभावी उद्योग सुरू करता येत नाही. अशा महिलांना बॉबकार्ड उद्योगपूरक वस्तु देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास सहकार्य करीत आहे. यानंतर त्यांना प्रशिक्षण देणेही महत्वाचे आहेत्यांना भविष्यात उद्योगवाढीसाठी आर्थिक साक्षर करणेगुंतवणुकीचे आणि बचतीच्या पर्यायांची माहिती देणे महत्वाचे असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

 या अंतर्गत या १५७ महिलांना पुढील सहा महिने व्यवसाय कौशल्यउद्योजकता याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Please follow and like us:

Related posts

महाराष्ट्र लोक भवन में मनाया गया तेलंगाना राज्य स्थापना दिवस

संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज करिता प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता