नदीपात्रात राडारोडा टाकणारांवर महापालिकेची कारवावी

पुणे 
नदीपात्रामध्ये राडारोडा टाकणाऱ्या आठ वाहनांवर महानगरपालिकेतून कारवाई करण्यात आली असून यामधून दोन लाख 25 हजार रुपये एवढी दंडाचे रक्कम वसूल करण्यात आले आहे.
कोंडवे धावडे या ठिकाणी  उपायुक्त  अविनाश सपकाळ, उपायुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रात राडाराडा टाकताना 8 गाड्यांवर व जेसीबी पकडून त्यांच्यावर प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण दोन लाख 25 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संदीप चव्हाण व नितीन लोखंडे, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, प्रदीपकुमार राऊत, कविता शिसोलीकर, रूपाली शेडगे व प्रशांत दामले, मोकादम अक्षय लांडगे सेवक अशोक आंधळे, सचिन अडसूळ उपस्थित होते
Please follow and like us:

Related posts

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी

कांदा उत्पादक,ग्राहकांच्या हितार्थ केंद्र सरकारचे नियोजन योग्य!

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडमॅप