डॉ सुलक्षणा शिलवंत यांच्या रॅलीने परिवर्तनाची नांदी

संत तुकाराम नगर

पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या रॅलीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात आता बदल अटळ आहे हे उस्फुर्त मतदारांनी दाखवून दिले.

डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आज पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर येथून झाला यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संत तुकाराम नगर मधील मतदारांनी यावेळी उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे उस्फुर्त स्वागत केले. ही रॅली म्हणजे पिंपरी विधानसभा मतदार संघातील बदलाची नांदी ठरणार अशी प्रतिक्रिया मतदारांनी यावेळी व्यक्त केली.

Please follow and like us:

Related posts

आत्मनिर्भर भारत” अभियानातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील : आमदार विक्रम पाचपुते

नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म’ मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेसाठी एक मोठी भेट; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंची माहिती

केंद्र सरकारकडून जीएसटी कपातीची धूळफेक – सुनील माने