डॉक्टरांच्या सांस्कृतिक महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद 

पिंपरी

इंडियन मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला  सांस्कृतिक महोत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषात चिंचवड येथे संपन्न झाला.

साडेसात तास चाललेला  कार्यक्रम आय एम ए शाखेच्या अध्यक्षा डॉ माया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या पार पडला.
यावेळी नृत्य, गायन, सौंदर्य स्पर्धा, सारीथॉन आणि महाराष्ट्राची लोकधारा अशा विविध कला गुण दर्शन  कार्यक्रमांमध्ये  100 हून अधिक डॉक्टर सदस्य व त्यांचे कुटुंबीय व मित्र मंडळींनी सहभागी होऊन आपली कला सादर केली .
कार्यक्रमांमध्ये प्रथमच फोटोग्राफी, पेंटिंग, रिल्स स्पर्धा झाल्या यामध्ये सर्व वयोगटातील शाखेचे डॉक्टर्स  व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे भाग घेवून आनंद घेतला.
सांस्कृतिक सोहळ्याचे उदघाटन प्रसंगी आय एम ए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.संतोष कदम आणि प्रसिद्ध गायक आशाताई खाडिलकर , आयएमए  महाराष्ट्र प्रदेश उपाध्य डॉ राजीव वरियाणी, प्रदेश सहसचिव डॉ अलका क्षीरसागर, आय एम ए पुणेचे अध्यक्ष डॉ राजन संचेती, शाखेचे  आधारस्तंभ डॉ. दिलीप कामत तसेच विश्वस्त  डॉ. संजय देवधर,डॉ. संजीव दाते, डॉ. विजय सातव,शाखाध्यक्ष डॉ माया भालेराव सचिव डॉ सारिका लोणकर,खजिनदार डॉ. मनीषा डोईफोडे, नियोजित अध्यक्ष डॉ सुधीर भालेराव व सांस्कृतिक समिती अध्यक्ष  डॉ. संजीवकुमार पाटील व डॉ.सुमेध अंदुरकर उपस्थित होते.
 यावेळी डॉ विकास मंडलेचा संपादित वार्षिक डायरी व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या सांस्कृतिक सोहळ्यासाठी यशस्वी होण्यासाठी डॉ. शंकर गायकवाड डॉ. शुभांगी कोठारी डॉ. ज्योती डेकाटे,डॉ दीपाली टोनगांवकर,डॉ.सुहास लुंकड डॉ.मिलिंद सोनावणे डॉ. रितू लोखंडे व डॉ. रूपाली करवा डॉ. अमृता इंगळे,डॉ. शुभांगी टेकुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी माहिती नियोजित अध्यक्ष डॉ सुधीर भालेराव दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ माया भालेराव यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ रूपाली एकबोटे,डॉ शिल्पा क्षीरसागर,डॉ निहार इंगळे यांनी तर  डॉ सारिका लोणकर यांनी आभार मानले.
Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप