गावाकडच्या मंडळींची कळकळ 

पिंपरी

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना विजयी करणे हे सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठीचे कर्तव्य आहे असे आवाहन आता गावाकडची मंडळी पिंपरी चिंचवड शहरात येऊन करू लागली आहेत.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे. फक्त आता मताधिक्य मोजणे एवढेच बाकी राहिले आहे. या विजयाच्या यशात पिंपरी चिंचवड शहरातील हजारो जण आपला हातभार लावत आहेत. पण आपणही कमी पडू नये, आपलेही या विजयात योगदान असावे असे सातारा सांगली कोल्हापूर येथील मंडळींना वाटू लागले असून, त्यांनी मतदानापर्यंत आपला मुक्काम पिंपरी चिंचवड शहरात करण्याचे निश्चित केले आहे. ही मंडळी आपापले मित्रमंडळी, नातेवाईक, स्नेही, आप्तेष्ट या सगळ्यांना भेटून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनाच विजयी करा व तिच्या यशात आपलाही वाटा निश्चित करा असे आवाहन करू लागले आहेत.

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे वडील कै. अशोकभाऊ शिलवंत यांचे राज्यात खूप मोठे योगदान आहे. शासकीय नोकरीत असतानाही त्यांनी समाजातील तळागाळातल्या वर्गाला मोठी मदत केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहोचावेत, तसेच सम्राट अशोक यांच्या कार्याचा परिचय लोकांना व्हावा. बुद्ध लोकांना समजावा यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्यांचे समाजाप्रती असलेले हे योगदान लक्षात घेऊन कै. अशोकभाऊ शिलवंत यांच्या विचाराने प्रेरित झालेले राज्यभरातील अनेक जण पिंपरी चिंचवड शहरात डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. त्यातही सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागातील लोकांचा उत्साह खूप मोठा दिसून येत आहे.

Please follow and like us:

Related posts

आत्मनिर्भर भारत” अभियानातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील : आमदार विक्रम पाचपुते

नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म’ मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेसाठी एक मोठी भेट; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंची माहिती

केंद्र सरकारकडून जीएसटी कपातीची धूळफेक – सुनील माने