पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत द्या!

 भाजपाचे विकास डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार  आर्थिक नुकसानभरपाई, नोकरी, घर, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी पिंपरी-चिंचवड  मोशी येथील कचरा डेपो परिसरात अतिवृष्टीमुळे लँडफिलचा काही भाग खचून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने…

Read more

मालमत्ता कर भरताना १० टक्के सवलत घेण्याची ३० जून २०२६ रोजी शेवटची संधी 

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता करावर जाहीर करण्यात आलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही शेवटची मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. ३० जूननंतर या सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वीच मालमत्ता कराचा भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन महापालिकेने केले आहे.   महापालिका हद्दीत सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटींहून अधिक मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख  ४६ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत योजनेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उर्वरित मालमत्ताधारकांनीही ३० जूनपूर्वी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.   तसेच, १ जुलैपासून मालमत्ता कर वसुली मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार आवाहन करून तसेच जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास हा आपल्या सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. नागरिकांनी भरलेला प्रत्येक रुपया शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि विविध विकासकामांमध्ये खर्च केला जातो. त्यामुळे ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर सवलतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकाने लाभ घ्यावा.  रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका  महापालिकेच्या उत्पन्नातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या सुविधांमध्ये आणि शहराच्या विकासकामांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे मालमत्ता कराची वेळेत वसुली ही महापालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना अधिक लाभ मिळावा म्हणून ३० जून २०२६ पर्यंत १० टक्के सवलत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आली आहे. या अंतिम संधीचा लाभ घेत नागरिकांनी कराचा भरणा करावा. यानंतर महसूल वसुलीच्या नियोजनानुसार विशेष मोहीम राबविण्यात येईल.  डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका  मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटची संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा. १ जुलै २०२६ पासून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई करण्यात येईल.   सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका   

Read more

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र अन्नधान्य वितरण कार्यालयाची मागणी

 लाभार्थ्यांना वेळेवर सेवा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा मुंबई / पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३२ लाख नागरिकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न विधानसभेत चर्चेत आला. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज विधानसभेत…

Read more

देशभरात सहावे स्थान मिळवून ‘डीपीयू’ने राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा; संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये घवघवीत यश!

पिंपरी शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) प्रतिष्ठित अशा ‘टाइम्स हायर एज्युकेशन सस्टेनेबिलिटी…

Read more

नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा!

 महापालिका, प्राधिकरण प्रशासनाला केली सूचना  राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत तात्पुरत्या निधीची तजवीज करा पिंपरी-चिंचवड पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड-राजगुरूनगर मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…

Read more

MIDC इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अधिवेशनात ऐरणीवर; लिफ्ट नाही, इमारती जीर्ण… आमदार अमित गोरखेंनी सभागृहात मांडली वृद्ध कामगारांची व्यथा

पिंपरी-चिंचवड मुंबई/पिंपरी-चिंचवड, 23 जून 2026: पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर आणि शाहूनगर येथील एमआयडीसीच्या (MIDC) हजारो जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा आणि तिथल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भाजप आमदार अमित गोरखे यांनी चालू विधिमंडळाच्या पावसाळी…

Read more

सुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव 

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.    या बैठकीला विधी समिती सदस्य तथा नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे, नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे, सिताराम बहुरे, संदीप खोत, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   बैठकीमध्ये सुरक्षा रखवालदार यांच्या पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. यापूर्वी जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील, त्यांना सुरक्षा सुपरवायझर या पदावर पदोन्नती देण्यात येत होती. तसेच पात्र सुरक्षा सुपरवायझर यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती दिली जात होती. मात्र विधी समितीने आता सुरक्षा सुपरवायझर व सुरक्षा निरीक्षक या दोन्ही पदांचे समायोजन करून सुरक्षा निरीक्षक हे एकच पद ठेवून त्यावर पात्र सुरक्षा रखवालदार यांना पदोन्नती देण्याबाबत ठराव केला आहे. याशिवाय बैठकीत होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट, महापालिकेची महसूलवाढ, महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या उपलब्ध जागा आदींबाबत चर्चा करण्यात आली.

Read more

रविवार दि. २८ जून रोजी शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’ 

पिंपरी जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, त्याअनुषंगाने देशात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.    याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.   या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत.   ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना व सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती…    शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील.   सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.   मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटिंग, व्हि.एम.डी डिस्प्ले (VMD), सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “पोलिओमुक्त भारताचे यश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. रविवार, दि. २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”  डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका …

Read more

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करा 

मावळ – मावळ तालुक्यातील कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या सचिवांकडे केली. त्यावर  खासगी कंपनीशी चर्चा…

Read more

महापालिका प्रशासकीय भवन अन्‌ ‘अजित सृष्टी’चे एकत्रित लोकार्पण!

 भाजपा आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांना सूचना पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या ‘अजितसृष्टी’ या प्रकल्पाचा समावेश…

Read more