रायगड मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जत, खालापूर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेत जमीन, भाताची रोपे वाहून गेली आहेत. फळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्याबाबतचा अहवाल …
पुणे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदार यादी त्रुटीमुक्त व अचूक तयार करण्यावर भर देत प्रत्येक टप्प्यावरील काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या …
पावसाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जनहिताच्या १४ प्रमुख मुद्यांवर आमदार अमित गोरखे यांनी उठवला बुलंद आवाज! मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परंपरेप्रमाणे घेतली जाणारी पत्रकार परिषद न घेता राखली सामाजिक संवेदनशीलता
पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे, विकासाचे आणि सुरक्षिततेचे विविध प्रलंबित प्रश्न शासनदरबारी अत्यंत प्रभावीपणे मांडले. लोकहिताच्या प्रत्येक विषयावर …
पिंपरी भारताच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीसाठी नवोपक्रम व संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आगामी काळात पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) हे स्टार्टअप केंद्रित विद्यापीठ म्हणून विकसित करण्यात येईल. तसेच हरित ऊर्जा, हवामान …
पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेबाबत आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक- खा. श्रीरंग बारणे
पिंपरी मावळातील पवना धरण परिसरातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत आंदोलनात सहभागी शेतकरी आणि प्रशासनाबरोबर सोमवारी समन्वय बैठक झाली. या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने संपूर्णा …
भाजपाचे विकास डोळस यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार आर्थिक नुकसानभरपाई, नोकरी, घर, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची मागणी पिंपरी-चिंचवड मोशी येथील कचरा डेपो परिसरात अतिवृष्टीमुळे लँडफिलचा काही भाग खचून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने …
राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
मुंबई राज्यातील वनसंपत्तीचे संरक्षण, बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा, वनमाफियांविरोधातील कारवाई आणि वन विभागाची कार्यक्षमता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत तारांकित …
पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता करावर जाहीर करण्यात आलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही शेवटची मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. ३० जूननंतर या सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वीच मालमत्ता कराचा भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका हद्दीत सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटींहून अधिक मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख ४६ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत योजनेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उर्वरित मालमत्ताधारकांनीही ३० जूनपूर्वी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. तसेच, १ जुलैपासून मालमत्ता कर वसुली मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार आवाहन करून तसेच जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास हा आपल्या सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. नागरिकांनी भरलेला प्रत्येक रुपया शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि विविध विकासकामांमध्ये खर्च केला जातो. त्यामुळे ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर सवलतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकाने लाभ घ्यावा. रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापालिकेच्या उत्पन्नातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या सुविधांमध्ये आणि शहराच्या विकासकामांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे मालमत्ता कराची वेळेत वसुली ही महापालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना अधिक लाभ मिळावा म्हणून ३० जून २०२६ पर्यंत १० टक्के सवलत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आली आहे. या अंतिम संधीचा लाभ घेत नागरिकांनी कराचा भरणा करावा. यानंतर महसूल वसुलीच्या नियोजनानुसार विशेष मोहीम राबविण्यात येईल. डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटची संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा. १ जुलै २०२६ पासून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा …
लाभार्थ्यांना वेळेवर सेवा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा मुंबई / पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३२ लाख नागरिकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न विधानसभेत चर्चेत आला. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज विधानसभेत …
