Home पिंपरी चिंचवड मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश 

मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड 

मोशी परिसरातील विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील नागरिकांनी परिसरात वारंवार प्लास्टिक, टायर व इतर भंगार जाळल्यामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर वायू प्रदूषणाबाबत महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाची महापौरांनी तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

  मोशी परिसरातील वाढत्या धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधत महापौर रवि लांडगे यांनी संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

 यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. शहरात कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही. स्वच्छ हवा, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित जीवनमान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अबाधित राखण्यासाठी प्रशासनामार्फत कठोर आणि प्रभावी कारवाई केली जाईल.”

  यावेळी मा. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे तसेच कविता आल्हाट उपस्थित होत्या. महापालिका आयक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.

  महापौरांच्या पुढाकारानंतर मोशी परिसरातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर तातडीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00