अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भित्ती
अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एपी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. या विमानातून 242 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये दोन पायलट, 10 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवाशांचा समावेश आहे. या सर्वच्या सर्व प्रवाशांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातग्रस्त विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. एअर इंडियाच्या या विमानात 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश प्रवासी, 7 पोर्तग्रीज प्रवासी आणि 1 कॅनेडियन प्रवासी प्रवास करत होते. तसंच, या विमानात 10 कॅबिन क्रू आणि 2 पायलट हे देखील होते. प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर 5 मिनिटांमध्येच हे विमान कोसळले. 700 फुटांहून खाली कोसळल्यानंतर या विमानाने पेट घेतला.
मेघानीनगर विमानतळापासून 15 किलोमीटर दूरवर आहे. अपघात होताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे. सोशल मीडियावर विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विमानाला अपघात होताच आग लागली. धुराचे लोट आसमंतात दिसू लागले. आपत्कालीन यंत्रणा सध्या अपघातस्थळी पोहोचलेल्या आहेत. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मेघानीनगर परिसराजवळ असलेल्या धारपूरमध्येही धुराचे लोट दिसत आहेत.
अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचे आहे. बोईंग ड्रीमलायनर 787 विमान 11 वर्षे जुने असल्याची माहिती समोर आलेली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला. अपघात होताच विमानाने पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. आग काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे. अपघातात विमानाचा एक पंख तुटला आहे. तो विमानापासून वेगळा झाला आहे.
अपघातात विमानाचे मोठे नुकसान झालेले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून भस्मसात झाला आहे. विमानानं एका इमारतीला धडक दिली. त्या इमारतीचंही मोठे नुकसान झाले आहे. विमानतळाजवळच रुग्णालय आहे. तिथल्या सगळ्या डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश देण्याच आलेले आहेत.
विमानात 230 प्रवासी होते. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. उर्वरित 12 जण क्रू मेंबर्स होते.
अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.
ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. माहितीनुसार, 15 डॉक्टर जखमी झाले आहेत. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-171 दुपारी 1:38 वाजता उड्डाण केले. ते दुपारी 1:40 वाजता कोसळले.
अहमदाबादमध्ये ज्या इमारतीवर एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले होते, त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे इंटर्न डॉक्टर राहत होते. हे इंटर्न डॉक्टरांचे वसतिगृह होते. विमान कोसळले तेव्हा तिथे 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते.
विमानात लागलेल्या आगीद्वारे निघणार्या धुरामुळे वसतिगृहाची इमारत पूर्णपणे काळी पडली आहे आणि सर्वत्र फक्त कचरा आहे. आत जाऊन पाहिले तर वसतिगृहाचे अवशेष झाले होते. मृतदेह इकडे तिकडे विखुरलेले होते.
या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइन क्रमांक 18005691444 हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे, असे एअर इंडियाने सोशल मीडिया साइट एक्स वरील पोस्टमधये नमूद केलं आहे.
