17
पिंपरी
जेएसपीएम संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (आरएससीओई), यआणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य क्वालकॉम टेक्नॉलॉजीज सोबत मुख्य प्रशिक्षण करार आणि कार्य अंमलबजावणी करार झाला. स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांसाठी ५जी तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
या करारावर दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या . या करारासाठी जेएसपीएमचे कॅम्पसचे संचालक डॉ सुधीर भिलारे,आरएससीओईचे संचालक डॉ. ए. एम. बडधे , इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. सी. वागज, अधिष्ठाता डॉ. सौरभ तायडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. क्वालकॉम टेक्नॉलॉजीजच्या सिमरन मेहरोत्रा यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभले. या कराराचा समन्वय, पाठपुरावा व यशस्वी अंमलबजावणी प्रा. विजय बरकडे यांनी केली.
या सहकार्यामुळे जेएसपीएम आरएससीओई मधील विद्यार्थ्यांना ५जी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वायरलेस दळणवळण या क्षेत्रांतील उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणपत्रे आणि जागतिक उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे संस्थेच्या उद्योग–शैक्षणिक सहकार्याला, कौशल्यविकासाला आणि विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Please follow and like us:
