पुणे
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट यांच्या पुढाकाराने व अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २२ फेब्रुवारी २०२६) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे शिबिर नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडले.
शिबिराचा सुमारे ११०० ते १२०० नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये रिक्षाचालक, वाहनचालक, पायी प्रवास करणारे नागरिक, महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
हे शिबिर चंद्रकांत पाटील (मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तातील साखर (BSL-R), रक्तगट, रक्तदाब, कोलेस्टेरॉल तसेच रक्तातील घटकांची (HB, RBC, WBC, PLT) तपासणी करण्यात आली. दंत तपासणी, कीड काढणे, सिमेंट भरणे, स्केलिंग व पॉलिशिंग या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
तसेच ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी, महिलांसाठी ४० ते ६० वयोगटातील स्तन कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) सुविधा देण्यात आली. महिलां व पुरुषांसाठी जवळच्या दृष्टीसाठी मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.
सुमारे १३,५०० रुपयांच्या आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश डोंगरे, ओंकार बगाडे, अमित सातव, साक्षी मुंढे, धनश्री पांगारे, किर्ती वर्मा, सोहन बंडीवडार, मानस लबडे, गौरव कुंभार, ओमकार नवले, आयुष लांडगे, गोविंद भोसले, सुमित कुंभार, प्रथम भालेराव, साई घोणे, अमोल सोयाम, अमर (तात्या) भालेराव, वैभव फल्ले, विश्वनाथ गायकवाड, मंगेश थोरात, सुजल साळेकर आदींनी परिश्रम घेतले.
पुणे : रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट के पहल पर तथा अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट के संयुक्त तत्वावधान में रविवार (दि. 22 फरवरी 2026) को आयोजित निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर को नागरिकों का उत्स्फूर्त प्रतिसाद मिला। यह शिविर नुमवी स्कूल के सामने, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक, पुणे में सुबह 10 बजे से शाम 6 बजे तक आयोजित किया गया।
शिविर का लाभ लगभग 1100 से 1200 नागरिकों ने लिया। इसमें रिक्शाचालक, वाहन चालक, पैदल आने वाले नागरिक, महिलाएं और युवाओं की बड़ी संख्या में सहभागिता रही।
यह शिविर चंद्रकांत पाटील (मंत्री, उच्च व तकनीकी शिक्षा तथा संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य एवं कोथरूड विधानसभा क्षेत्र के विधायक) के मार्गदर्शन में तथा समर्थ युवा फाउंडेशन के माध्यम से आयोजित किया गया।
शिविर में सामान्य स्वास्थ्य जांच, रक्त शर्करा (BSL-R), रक्त समूह, रक्तचाप, कोलेस्ट्रॉल तथा रक्त के घटकों (HB, RBC, WBC, PLT) की जांच की गई। इसके साथ ही दंत जांच, कीड़ा निकालना, फिलिंग (सीमेंट भरना), स्केलिंग और पॉलिशिंग जैसी सेवाएं भी उपलब्ध कराई गईं।
इसके अतिरिक्त 40 वर्ष से अधिक आयु के नागरिकों के लिए मोतियाबिंद और ग्लूकोमा जांच, तथा 40 से 60 वर्ष आयु वर्ग की महिलाओं के लिए स्तन कैंसर जांच (मैमोग्राफी) की सुविधा उपलब्ध कराई गई। महिलाओं और पुरुषों के लिए निकट दृष्टि हेतु निःशुल्क चश्मों का वितरण भी किया गया।
लगभग 13,500 रुपये मूल्य की स्वास्थ्य जांच पूर्णतः निःशुल्क उपलब्ध कराए जाने के कारण नागरिकों ने बड़ी संख्या में इसका लाभ उठाया।
शिविर की सफलता के लिए दिनेश डोंगरे, ओंकार बगाडे, अमित सातव, साक्षी मुंढे, धनश्री पांगारे, किर्ती वर्मा, सोहन बंडीवडार, मानस लबडे, गौरव कुंभार, ओमकार नवले, आयुष लांडगे, गोविंद भोसले, सुमित कुंभार, प्रथम भालेराव, साई घोणे, अमोल सोयाम, अमर (तात्या) भालेराव, वैभव फल्ले, विश्वनाथ गायकवाड, मंगेश थोरात, सुजल साळेकर सहित अन्य कार्यकर्ताओं ने विशेष परिश्रम किए।
