मुंबई अंतर असणे म्हणजे रक्षाबंधन खास बनवणाऱ्या छोट्या गोष्टींना मुकणे असे नाही. डीएचएल एक्सप्रेसने राखी एक्सप्रेस पुन्हा आणली आहे, ज्याअंतर्गत ग्राहकांना भारतातून आंतरराष्ट्रीय शिपमेंट्स*वर फ्लॅट ५०% …
देशातील पहिले स्वयंचलित ई ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित मुंबई देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे. …
पिंपरी चिंचवड
-
पिंपरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळातील पवना धरण १०० टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी दुथडी भरून वाहत असताना १५ टक्के पाणी कपात कायम कशासाठी ठेवली आहे?, असा …
-
पिंपरी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे(दि.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील …
-
पिंपरी-चिंचवड “स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य – हीच आपली दिशा!” या धोरणाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जोरदार पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला थेट भेट दिली आणि तेथील संपूर्ण कामकाजाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान सभापतींनी कचरा व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेतली. शहरातून गोळा होणारा ओला व सुका कचरा कशा पद्धतीने गोळा केला जातो, केंद्रावर त्याचे वर्गीकरण कसे होते आणि त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट कशी लावली जाते, याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, कचरा संकलन केंद्राचा परिसर आणि आजूबाजूच्या भागात उत्तम स्वच्छता राखली जावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवर्जून सूचना दिल्या. शहराचा विस्तार वेगाने होत असून आगामी काळात लोकसंख्या आणखी वाढणार आहे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे. ही भविष्यातील गरज लक्षात घेऊन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनाचे अधिक सक्षम आणि दूरगामी नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश सभापती अभिषेक बारणे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा अधिकाधिक गतिमान व प्रभावी ठेवण्यावर महापालिकेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, थेरगाव आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती लेखी मागणी पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा ते खेड उन्नत कॉरिडॉर (Twin Elevated Corridor) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला मोठा दिलासा मिळाला असून, पुणे महानगर प्रदेश …
-
पिंपरी वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात सोमवारी सकाळी निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीन अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचाव व अग्निशमन कार्य हाती घेतले. प्राथमिक माहितीनुसार, चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यानंतर आगीने शेजारील दोन मजली इमारतीलाही वेढा दिला. आग लागल्यानंतर इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसाने व सुरक्षित सुटका केली. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच आग परिसरातील इतर ठिकाणी पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाच्या वेगवान प्रतिसादामुळे आग अधिक वाढण्यापासून रोखण्यात यश आले. याप्रसंगी उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली लीड फायरमन विनायक नाळे व शहाजी कोपनर तसेच फायरमन प्रल्हाद कोरडे, पंकज रसाळ, अमोल कुऱ्हाडे, इरफान बेलदार, एकनाथ ढगे, सखाराम चिमटे, भूषण येवले, तुषार बिरहाडे, सोहन तुकदेव, प्रकाश गव्हाणे, तेजस्वी पाटील, एकनाथ बुधवंत, सागर लावंडे, सागर गुरव, राहुल धुमाळ, महेश गरड, बालाजी सानप आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि बचावकार्य यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. निवासी इमारतींमध्ये चार्जिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेतल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असून, या घटनेत जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन महिलांचे प्राण वाचविण्यात यश आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले.
-
पिंपरी-चिंचवड मोशी परिसरातील विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील नागरिकांनी परिसरात वारंवार प्लास्टिक, टायर व इतर भंगार जाळल्यामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर वायू प्रदूषणाबाबत महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाची महापौरांनी तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. मोशी परिसरातील वाढत्या धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधत महापौर रवि लांडगे यांनी संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली. यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. शहरात कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही. स्वच्छ हवा, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित जीवनमान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अबाधित राखण्यासाठी प्रशासनामार्फत कठोर आणि प्रभावी कारवाई केली जाईल.” यावेळी मा. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे तसेच कविता आल्हाट उपस्थित होत्या. महापालिका आयक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले. महापौरांच्या पुढाकारानंतर मोशी परिसरातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर तातडीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


