Home पिंपरी चिंचवड दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा सत्कार

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा सत्कार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी बुके किंवा इतर भेटवस्तू न देता पुस्तके व वह्यांचे संच द्यावेत, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले होते. त्यानुसार, दिशा सोशल फाऊंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आणि संचालक ॲड. अविनाश ववले यांच्या हस्ते वह्या व शालोपयोगी वस्तू देऊन महापौरांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा उद्योजक शिवराज काटे यांचादेखील सन्मान कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांच्या हस्ते करण्यात आला.
     यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, संचालक गणेश लंगोटे, राजेश सावंत, शरीफ शेख आदी उपस्थित होते.
चौकट :- “अरुणा लंगोटे यांचा विजय म्हणजे सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची पोचपावती” 
दिशा सोशल फाऊंडेशनचे संचालक गणेश लंगोटे यांच्या पत्नी अरुणाताई लंगोटे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका (प्रभाग क्रमांक १४) येथून निवड झाल्याबद्दल दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा घरगुती स्वरूपात छोटेखानी सत्कार करण्यात आला. मोहननगर येथील लंगोटे यांच्या संपर्क कार्यालयात हा हृद्य सोहळा संपन्न झाला. दिशा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, कोषाध्यक्ष नंदकुमार कांबळे, मा.कार्याध्यक्ष सचिन साठे, संचालक अतुल शिंदे आदी उपस्थित होते. सर्व दिशा सभासदांनी त्यांना उज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. गणेश लंगोटे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो गरजूंना मदतीचा हात दिला आहे. परिसरातील नागरिकांची अनेक कामे ते नित्यनेमाने करत आले आहेत. याची फलनिष्पत्ती म्हणूनच मतदार राजाच्या आशिर्वादाने ते निवडून आले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही एकप्रकारे पोचपावती मिळाली आहे. 
     सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना, लंगोटे यांनी मतदारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00