Home महाराष्ट्र बारामती महिला रुग्णालयास बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार

बारामती महिला रुग्णालयास बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
बारामती
बारामती महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण भागातील महिलांना दिलासा आहे. तसेच बाह्यरुग्ण विभाग ३७ हजार ३३४, आंतररुग्ण विभाग ११ हजार ६२५, खाटा आरक्षित प्रमाण १०३.९६ टक्के, मोठ्या शस्त्रक्रिया २ हजार ३९०, लहान शस्त्रक्रिया २ हजार १४६ करण्यात आल्या आहेत.
याकरिता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे रुग्णालयात आरोग्य सुविधा बळकटीकरणासोबत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. तसेच पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ नागनाथ यम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ करिता एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कामगिरीनुसार दरमहा मुल्यमापन करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य विभागाचे ठरवलेल्या निकषानुसार पुरस्काराकरिता रुग्णालयाची निवड करण्यात येते. महिला रुग्णालय प्राप्त गुण अमरावती जिल्हा महिला रुग्णालयास २१.२ गुण मिळाले असून प्रथम क्रमांक तर बारामती महिला रुग्णालयास २१ गुण मिळवून दुसरा क्रमांक तर नागपूर जिल्हा महिला रुग्णालय डागा २० गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये महिला रुग्णालयाच्या वर्गवारीमध्ये “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ महिला रुग्णालयास प्राप्त झाला आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृह, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बापू आनंदराव भोई यांनी पुरस्कार स्विकारला.
डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकीत्सक:* बारामती येथील महिला रुग्णालयामध्ये पुणे मंडळामध्ये महिलांची सर्वात अधिक प्रसुती होतात, सर्व मातांना उच्च व दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जातात. राज्यामध्ये महिला रुग्णालय दुसऱ्या क्रमांकांचा पारितोषिक पटकाविला असून आमच्याकरिता आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
डॉ. बापू आनंदराव भोई, वैद्यकीय अधिक्षक :* महिला रुग्णालयात आलेल्या रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सेववा उपलब्ध होईल, याकरिता सातत्याने प्रयत्नशील आहोत. आगामी कालावधीमध्ये सर्व गरोदर मातांना उत्कृष्ट दर्जेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00